दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!

सुरक्षेकरिता मुलांना घरी पाठवले

दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!

दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.दिल्ली आणि नोएडामधील अशा ५० हुन अधिक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे.त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव शाळेतील मुलांना घरी पाठवण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) द्वारका आणि वसंत कुंज युनिट्स, पूर्व मयूर विहारमधील मदर मॅरी स्कूल, संस्कृती स्कूल, पुष्प विहारमधील एमिटी स्कूल आणि दक्षिण पश्चिम दिल्लीतील डीएव्ही स्कूल अशा अनेक शाळांना बॉम्बची धमकी मिळाली.नोएडालामधील एका शाळेला बॉम्बच्या धमकीचा ईमेल मिळाला आहे.धमकी मिळताच शाळेचा परिसर रिकामा करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन: कथा अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची!

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या भाचीने केली ‘व्होट जिहाद’ ची घोषणा

धमकीच्या मेलची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि बॉम्ब निकामी पथक (BDS) घटनास्थळी दाखल झाले.शाळेच्या आवारात कसून झडती घेण्यात आली परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.मदर मेरी स्कूल, संस्कृती स्कूल, एमिटी स्कूल आणि डीपीएस नोएडा येथील कॅम्पसमध्येही झडती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी म्हणाल्या की, सरकारी अधिकारी, दिल्ली पोलिस आणि शाळा अधिकाऱ्यांच्या आम्ही सतत संपर्कात होते. पालकांना घाबरू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.काही शाळांना आज सकाळी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्या परिसराची दिल्ली पोलिसांकडून झडती घेण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याही शाळेत काहीही आढळले नाही. आम्ही पोलिस आणि शाळांच्या सतत संपर्कात आहोत. विनंती करून पालकांनी आणि नागरिकांनी घाबरू नका, असे शिक्षण मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version