जगातील सर्वात मोठे बिगर राजकीय स्वयंसेवी संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर हल्ला झाला आहे. वाराणसी येथील रा.स्व.संघाच्या शाखेवर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात शाखेत उपस्थित असलेले स्वयंसेवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शाखेत उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांवर सुतळी बॉम्ब टाकत हा हल्ला करण्यात आला. या वेळी शाखेत अनेक बाळ स्वयंसेवकाही उपस्थित होते
वाराणसी येथे सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत लागणाऱ्या प्रातः शाखेसाठी स्वयंसेवक एकत्रीत जमले होते. यावेळी दैनंदिन वेळेत शाकाहा सुरु झाली आणि स्वयंसेवकांची शाखेतली नित्यकर्मे देखील वेळापत्रकानुसार सुरु होती. पण अशातच सकाळी ६.४९ च्या सुमारास शाखेवर पहिला बॉम्ब हल्ला करण्यात आला. हा एक प्रकारचा सुतळी बॉम्ब होता. हा बॉम्ब शाखेच्या हद्दीबाहेर पडला. पण फुटला नाही.
हे ही वाचा:
आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर
अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?
मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर
“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र
त्या नंतर ७ वाजता पुन्हा एकदा दुसरा बॉम्ब टाकण्यात आला. हा बॉम्ब देखील फुटला नाही. दरम्यान या दोन हल्ल्यांनंतर स्वयंसेवक तसे सावध झाले होते आणि हल्लेखोरांना शोधू लागले. पण इतक्यातच ७.०५ वाजता शाखेवर आणखीन एक बॉम्ब फेकण्यात आला. हा बॉम्ब स्वयंसेवकांच्या घोळक्यात पडला आणि फुटला. यात एक स्वयंसेवक जखमी झाला आहे.
विजय जयस्वाल असे जखमी स्वयंसेवकाचे नाव आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.