बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अमिताभ यांनी या अपघाताची माहिती ब्लॉगवर दिली आहे. त्यानंतर अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
रविवारी KBC च्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग सुरू होते. यावेळी अमिताभ यांचा पाय कापला गेला. तेव्हा त्यांच्या पायाच्या मागची नस कापली गेली. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
अभिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडती’ च्या १४ व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या दमदार आवाजाने आणि सूत्रसंचालनाच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १४’ या क्विझ शोच्या सेटवर हा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाची नस कापली गेली आहे. याची माहिती स्वत: बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, सेटवर त्यांचा पाय कापल्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा:
सोन्याच्या खरेदीने चेहरे उजळले
शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी
पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून ते पूर्णपणे बरे आहेत, अशी माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना पायावर जोर देण्यास किंवा चालण्यास मनाई केली आहे. बिग बींनी नुकताच त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला होता.