26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषलता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

Google News Follow

Related

भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. लता दीदींच्या जाण्याचे वृत्त कळताच बॉलीवू़डमधील अनेक सेलिब्रेटींनीही आदरांजली वाहिली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित हिने ज्या आवाजाने लता दिदींनी आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडले तोच आवाज आता प्रेम पसरवण्यासाठी स्वर्गात गेला आहे, अशा शब्दात लता दीदींबद्दल माधुरी दिक्षित हिने भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलीवूड क्वीन म्हणून ओळख असलेली कंगना रनौत हिने इंस्टावर पोस्ट शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटले आहे की, भारताने आपला सुंदर आवाज गमावला आहे. लता दीदींसारखी अन्य कुणी होणार नाही.

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी देखील ट्विट संगीतातील प्राण म्हणून लता दीदींची ओळख होती. त्यांनी गायलेली गाणी आजही चाहत्यांच्या मनात आहेत. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही, असे भाव व्यक्त केले आहेत.

हे ही वाचा:

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

‘लता दिदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला’

स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

‘लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे’

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यानेही लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. मेरी आवाजही मेरी पहचान है, असे सांगणाऱ्या लता दीदींचा आवाज जगभरात लोकप्रिय होता. त्यांच्या जाण्याने आपल्या संगीत विश्वाची मोठी हानी झाल्याचे अक्षय कुमार याने म्हटले आहे.

लता मंगेशकर या माझ्या आदर्श आहेत. मी नेहमीच त्यांची गाणी ऐकत आलो आहे. आम्ही खरचं किती भाग्यवान आहोत की, आम्ही त्यांची गाणी ऐकत मोठे झालो, अशा भावना अभिनेता अजय देवगण याने व्यक्त केल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा