ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळाली. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हिंदी चित्रपटातील अभिनेते मनोज कुमार यांचे दीर्घ आजारानं निधन झालं.
मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मधे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झालेला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. फाळणीनंतर मनोज कुमार १० वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखान येथून दिल्लीला स्थलांतरीत झाले.
मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब और पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचं तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केलं होतं. मनोज कुमार यांनी सहारा, चांद आणि हनीमून सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांना कांच की गुडिया सिनेमा मिळाला ज्यामध्ये ते पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसले. त्यांच्या चित्रपटांमधली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे, मोती हे गाणे तर विशेष लोकांच्या स्मरणात आहे.
हे ही वाचा:
वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर; १२८ वि. ९५ मतांनी संमत
Chaitra Navratri: आज चैत्र नवरात्राचा सातवा दिवस, ही कथा नक्की वाचा
Viral Video: ‘अत्याचार’: ‘साहेब, मला वाचवा…’,
रस्त्यांची कामं फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा, नागरिकांची त्रासातून सुटका करा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतले आदर्श होते. त्यांच्या देशभक्तीविषयक चित्रपटांसाठी ते ओळखले गेले. तसंच त्यांच्या मनातही देशाभिमान होता. त्यांच्याकडून आम्हाला कायमच प्रेरणा मिळत राहिल. मनोज कुमार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशा आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
Deeply saddened by the passing of legendary actor and filmmaker Shri Manoj Kumar Ji. He was an icon of Indian cinema, who was particularly remembered for his patriotic zeal, which was also reflected in his films. Manoj Ji's works ignited a spirit of national pride and will… pic.twitter.com/f8pYqOxol3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025