उत्तर प्रदेशमध्ये बॉयलरच्या स्फोटात आठ मजुरांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये बॉयलरच्या स्फोटात आठ मजुरांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यात एका इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती युनिटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बॉयलरचा स्फोट झाल्याने या युनिटला आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये शनिवार, ४ जून रोजी धौलाना भागात इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मिती युनिटमध्ये बॉयलरचा जोरात स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. या आगीत आठ मजूर जिवंत जळाले असून १५ जण भाजले आहेत. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेमुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

हे ही वाचा:

‘घोडेबाजार’ शब्दावरून अपक्ष नाराज

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक

शिक्षकांच्या प्रशिक्षणात गोंधळ; ऑफलाइन प्रशिक्षण घेण्याची मागणी

शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

अपघातावेळी या कारखान्यात सुमारे २५ कामगार काम करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मदतकार्य सुरू असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version