कोरोना काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे मध्ये ‘ब्लॅक लिस्ट’ केलेल्या ‘लाईफ लाईन हॉस्पिटलला’ मुंबईतील वरळी येथील NSCI जम्बो कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. हे कॉन्ट्रॅक्ट माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून देण्यात आलं होतं. असा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार तथा नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे.आज झालेल्या मुंबईतील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणत्या आधारावर दिला असा प्रश्न सोमैया यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पुण्यातील सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्यानंतर या संदर्भातील चौकशी करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेला दिले होते महापालिकेने या संबंधित अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले होते ,असे देखील सोमैया यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशातील “मोस्ट वॉन्टेड’ लंगूर माकडाला चार तासांच्या शोधमोहिमेनंतर पकडले
पाटण्यामधील बैठक ही ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक
महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय… म्हणत आशिष शेलारांचे ठाकरेंना सवाल
‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’
मुंबई महानगरपालिकेने या कोरोनाच्या काळामध्ये ३८०० कोटी रुपये उभारण्यात खर्च केले होते. या सर्व प्रकरणांमध्ये १ हजार कोटी रुपयांच्या वर गैर व्यवहार झाला असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी अनेक कारणे देत चौकशी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता या प्रकरणात इकबाल चहल यांच्यासह महापालिकेतील या संबंधित इतर अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमैया यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार असलेले सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला शंभर कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यामधील ३२ कोटी ६० लाख रुपयांचे पेमेंट महापालिकेने केले होते. यापैकी सुमारे १३ कोटी रुपये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीचे सुजित पाटकर व अन्य भागीदारांनी निव्वळ नफा म्हणून आपल्या स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. तसेच अन्य भागीदारांनी १० कोटी २५ लाख रुपयांचे बोगस बिले तयार करून त्या खात्यांवर पैसे जमा केले. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीच्या बँक खात्यातून श्री. बाळा चव्हाण यांच्या खात्यात सुमारे १.५० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले असल्याची माहिती सोमैया यांनी दिली.
या कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे हा पैसा कुठे गेला या संदर्भातील चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील सोमैय्या यांनी केली आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीच्या बँक खात्यातून ज्या बोगस कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, अशा बोगस कंपन्यांची सोमैया यांनी माध्यमांसमोर एक लिस्ट प्रसारित केली यामध्ये एकूण आता पर्यंत ११ कंपन्यांची नावे नमूद करण्यात आली असून याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी असे सोमैया यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले, या घॊटाळ्या संबंधित ज्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत त्याची माहिती उद्धव ठाकरे ,संजय राऊत यांनी द्यावी. या संपूर्ण तपासाचा शेवट हा आदित्य ठाकरे यांच्या जवळ जाऊन थांबेल, असेही सोमैया म्हणाले.