आसाम: कोळसा खाणीत अडकलेल्या ९ कामगारांपैकी एकाचा मृत्यू!

लष्कर, नौदल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे बचावकार्य सुरु 

आसाम: कोळसा खाणीत अडकलेल्या ९ कामगारांपैकी एकाचा मृत्यू!

आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील कोळसा खाणीत गेल्या तीन दिवसांपासून कामगार अडकले आहेत. खाणीत अचानक पाणी भरल्याने कामगार आत अडकले आहेत. लष्कर आणि नौदलाचे कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. दरम्यान, बचाव कार्यादरम्यान आज (८ जानेवारी) एका मजुराचा मृतदेह सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिमा हासाओच्या कोळसा खाणीत काम सुरू असताना अचानक पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा जोरदार प्रवाह खाणीत घुसल्याने कामगार तेथे अडकले. खाणीत ९ कामगार अडकल्याची माहिती आहे. यापैकी बचाव पथकाने आज एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढला. उर्वरित कामगारांचा शोध सुरु आहे.

हे ही वाचा : 

पवारांचा टाहो ! लोकप्रतिनिधींना वाचवा हो…

मुंडेंची दादांना तासभर शुभेच्छांसाठी मिठी!

पी. डीमेलो रोडवर थरार, अंगाडीया व्यवसायिकावर गोळीबार करुन ४७ लाखांचे सोने लुटले

‘आका’ सोरोसला पुरस्कार,कोणाला आठवले यूपीए सरकार ?

लष्कर, नौदल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक खाणीतून पाणी काढून अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. गोताखोरांचे (पाणबुड्या) पथक खाणीत घुसून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि खाणीची खोली यामुळे मदतकार्यात अडचण निर्माण होत आहे.

अडकलेल्या मजुरांचे कुटुंबीय घटनास्थळी सतत उपस्थित असून त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहेत. बचावकार्याला गती देण्याचे आवाहन कुटुंबीयांनी प्रशासनाला केले आहे.

Exit mobile version