पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..

अज्ञात बोटीविरोधात केली कारवाई

पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यात ४२ सागरी मैल आतमध्ये एक अज्ञात बोट आढळल्याचे वृत्त आहे. त्यानंतर नौदलाने तात्काळ पोलिसांना यासंदर्भात फोनवरून कळवले होते. त्या बोटीचा पाठलाग करत ती ताब्यात घेण्यात आली.

स्थानिक पोलिस बोटीसह तिथे पोहोचले आणि पुढील कारवाई नौदलाकडून होणार आहे. पालघरच्या समुद्रकिनाऱ्या ही बोट आढळली आहे. त्यात १५ जण होते असेही म्हटले जात आहे. त्यापैकी १३ जणांकडे सगळी कागदपत्रे होती तर दोघांकडे कागदपत्रे नव्हती. यात पाकिस्तानी नागरीक असल्याचा संशय व्यक्त केला जात होता पण नंतर तो खोटा ठरला.

हे ही वाचा:

संजय राऊत यांना बजावली १०० कोटींची मानहानीची नोटीस

पंचगंगा -अमर संदेश आणि दादोजी कोंडदेव -आदर्श अंतिम फेरीसाठी झुंजणार

मालेगावचे उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर गुन्हा

स्थापना दिवस साजरा करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु

गेल्या वर्षी हरिहरेश्वर येथे संशयित बोट सापडली होती. त्यामुळे देशात खळबळ उडाली होती. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ सापडलेल्या या बोटीत दोन तलवारी आणि दोन चॉपर सापडले होते. शिवाय, ३ एके ४७ आणि काडतुसेही मिळाली होती. ही बोट ऑस्ट्रेलियातील असल्याचेही समोर आले होते. एका ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट होती आणि तिचा कॅप्टन त्या महिलेचा नवराच होता. ही नौका समुद्राच्या प्रवाहामुळे भरकटत हरिहरेश्वरला आली होती. राज्यातील अधिवेशनादरम्यान ही घटना समोर आली होती. त्यामुळे त्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

Exit mobile version