भाट्ये समुद्रात बोट बुडाली, दोन जण बेपत्ता

भाट्ये समुद्रात बोट बुडाली, दोन जण बेपत्ता

रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर पाच जण असल्याची माहिती असून त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

एका छोट्या बोटीवर भाट्ये समुद्रात मासेमारी सुरू होती. या बोटीवर पाच जण होते तर मासेमारी सुरू असतानाच अचानक ही बोट बुडाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या बोटीमध्ये एकूण पाच जण होते. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं असून दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचं स्पष्ट कारण अजून समोर आलेलं नाही.

हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

राज्यासह कोकणात पावसाने जोर धरला असून राज्यातही शनिवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदी काठच्या गावांना तसेच खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version