सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण पात्रात दोन दिवसांपूर्वी बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी (२३ मे ) अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटून तीन जवानांचा मृत्यू झाला.या दोन्ही घटना ताज्या असताना आणखी एक बोट पलटल्याची घटना समोर येत आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात आणखी एक बोट पलटली आहे.या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात जण खलाशी बुडाले.गुरुवारी(२३ मे) रात्री ही घटना आहे.मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली.बोटीतील सातही खलाशी बुडाले.यापैकी तिघांनी पोहून किनारा गाठला, तर चौघे जण बेपत्ता होते.यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघेजण बेपत्ता आहेत.बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.वादळी वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडली.
हे ही वाचा:
डोंबिवली दुर्घटनेत मृतांचा आकडा ११ वर!
प्रशांत किशोर त्यांच्या निवडणूकपूर्व अंदाजावर ठाम!
‘जो काँग्रेसच्या पावलावर चालेल, तो रसातळाला जाईल’
‘अरविंद केजरीवाल हे ‘अनुभवी’ चोर’
बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले आहे.