अमरावतीत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले

अमरावतीत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले

अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोट उलटल्याने वर्धा नदीपात्रात ११ जण बुडाल्याची माहिती आहे. तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले असता या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. या शोध कार्यासाठी तालुका प्रशासनातील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळावर दाखल आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा:

खरी अफगाण संस्कृती दर्शवण्याचा अफगाण महिलांचा प्रयत्न

‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते.

अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

मृतांची नावे:

१. नारायण मटरे, वय ४५ वर्ष, रा. गाडेगाव

२. वांशिका शिवणकर, वय २ वर्ष, रा. तिवसाघाट

३. किरण खंडारे, वय २८ वर्ष, रा. लोणी

Exit mobile version