झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

घटनास्थळी बचावकार्य सुरू

झेलम नदीत बोट उलटली; विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता

श्रीनगरमधील झेलम नदीत मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनगर येथील बटवारमधील झेलम नदीमध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, या बोटीमध्ये १० ते १२ शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण प्रवास करत होते. बोट उलटल्यानंतर अनेक जण बेपत्ता आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले आहे.

श्रीनगरमधील बटवारा येथे ही दुर्घटना घडली आहे. अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला ही बोट प्रवास करत होती. त्यावेळी पहाटे बटवारा भागाजवळ झेलम नदीत ही बोट प्रवाशांना घेऊन उलटली. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. स्थानिक लोक SDRF आणि इतर अधिकाऱ्यांना त्वरीत बचावकार्य सुरू केले आहे. या बोटीमध्ये १० ते १२ शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण होते. अनेकजण बेपत्ता आहेत.

हे ही वाचा:

ओडिशामध्ये पुलावरून बस कोसळून अपघात; पाच ठार

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

काश्मीर खोऱ्यात गेल्या ७२ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे झेलम नदी धोक्याच्या चिन्हाजवळून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह खूप वाढल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नद्यांच्या पाणी पातळीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूंछ-राजौरी जिल्ह्यांना थेट काश्मीरशी जोडणाऱ्या मुघल रोडवर बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्येही अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Exit mobile version