26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषपालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

Google News Follow

Related

मुंबई व आसपासच्या भागात रस्त्यांची झालेली चाळण आणि रस्त्यांना पडलेले खड्डे तसेच त्यामुळे होणारे अपघात यांची गंभीर चर्चा गेले अनेक दिवस सुरू असली तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेला मात्र केवळ ९२७ खड्डेच मुंबईत आढळले आहेत. यावर नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी टीकेची झोड उठविली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वेबपोर्टलवर केवळ ९२७ खड्डेच दाखविण्यात आले आहेत. २५ सप्टेंबरला या वेबपोर्टलवर केवळ ९२७ खड्ड्यांची नोंद असल्याचे दिसते. त्यातील ४३२ खड्डे हे बुजविण्यात आले आहेत तर ४२१ खड्डे हे बुजविण्याची प्रक्रिया सुरू आहे. खड्ड्यांच्या बाबत केवळ ७४ तक्रारीच पालिकेकडे आलेल्या आहेत, असेही वेबपोर्टलवर दिसते.

पण ही आकडेवारी फसवी आहे आणि वास्तव काही वेगळेच आहे, अशी टीका होऊ लागली आहे.

पालिकेतील विरोधी पक्षांनी म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेने हे खोटे आकडे दाखविले आहेत. एकेका वॉर्डातच खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसते. शिवाय, गेली अनेक वर्षे खड्ड्यांची ही समस्या मूळापासून सोडविण्यास पालिका अपयशी ठरली आहे.

पालिकेच्या या वेबपोर्टलवरील माहितीनुसार अंधेरी जोगेश्वरीत केवळ १२३ खड्डे आहेत. तर मालाडमध्ये केवळ ५७ खड्डेच आढळले आहेत. कुर्ल्यामध्ये अधिक स्थिती चांगली आहे. तिथे केवळ ५० खड्डेच पडले आहेत. पण प्रत्यक्षात विविध ठिकाणी रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशीच स्थिती आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते आहे.

हे ही वाचा:

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

आधी मराठी शाळा तर वाचवा, मग ‘केंब्रिज’कडे वळा!

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ३३१५६ खड्डे कोल्ड मिक्सच्या सहाय्याने बुजविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक वॉर्डसाठी २ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे कळते पण त्याचा नेमका कुठे उपयोग होतो हे मात्र आकलनाच्या पलिकडे असल्याची टीका होऊ लागली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा