उच्च न्यायालयाने पावसाळ्यात घरांवर हातोडा मारू नका, असे आदेश देऊनही पालिकेने नालेसफाई करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या घरावर कारवाईचा बडगा उगारला. पालिकेने बोरिवलीतील नालेसफाई करणारे कामगार आहेत, त्यांच्या घरावर हातोडा चालवला. ऐन पावसात कोणतीही कारवाई करून नये असे आदेश हायकोर्टाने दिले होते. तरीही पालिकेने मात्र ही कारवाई केली. १३ ऑगस्टपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे स्पष्ट सांगूनही पालिकेने त्याआधीच कारवाई उरकून घेतली. पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे तब्बल ४५ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे या कुटुंबांच्या अनेक वस्तुंचे नुकसान झाले आहे.
बोरिवलीतील चिकूवाडी मधील जवळपास ४५ श्रमिक मजूर आता बेघर झालेले आहेत. मुख्य म्हणजे या कारवाईमुळे अन्नधान्य, तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे या सर्व गोष्टींचे नुकसान झालेले आहे. या घरांमध्ये मुख्यतः हातावर पोट असलेले वास्तव्यास आहेत. त्यामुळेच रोज कमवायचे आणि खायचे हाच यांचा दिनक्रम. ऐन पावसाळ्यात केलेल्या या श्रमिकांवरील कारवाईमुळे आता जायचे कुठे हा प्रश्न यांच्यासमोर उभा राहिला आहे.
हे ही वाचा:
प्रेक्षकविरहित ऑलिम्पिक स्टेडियममध्ये खेळणार खेळाडू
चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे?
काही शाळांची मान्यता रद्द, पण त्याने काय होणार?
‘पालिकेतील वजनदार नेत्याच्या आशीर्वादाशिवाय हा भ्रष्टाचार अशक्यच’
कोरोनाच्या लाटेत कारवाई न करण्याचे आदेश दिले असतानाही महापालिकेने मुजोरी दाखवली. या घरांवर हातोडा आल्यामुळे अखेर या ४५ घरातील लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. मुख्य म्हणज कारवाईसाठी आलेल्या अधिकारी वर्गाला कारवाई करू नये याकरता मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि शासन यांची माहिती दिली. परंतु तरीही पालिकेच्या मुजोर अधिकारी यांनी काहीच ऐकले नाही.
मुंबई पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश आणि जीआर दाखविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पालिकेने ही कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे, त्यामुळे पालिकेवर कारवाई करण्याची मागणीही या घर तुटलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.