मुंबई महानगरपालिकेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

मुंबई महानगरपालिकेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

सध्या संपूर्ण देशात कोविडचे थैमान चालू आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा सातत्याने तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी काही रुग्णांचा मृत्यु देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प सुरू केले आहेत.

कोविडमध्ये अत्यवस्थ रुग्णाला श्वसनास त्रास होण्याची शक्यता असते. काही काही वेळेस त्यांना प्राणवायू बाहेरू पुरवावा लागतो. रुग्णालयांमध्ये शुद्ध स्वरूपातील द्रवरूप वैद्यकिय ऑक्सिजन आणला जातो. तो रूग्णांना पुरवला जातो. मात्र  सध्या देशात असलेला तुटवडा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने १२ रुग्णालयांच १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प बसवले आहेत.

हे ही वाचा:

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

सिंगापूरमधूनही ऑक्सिजनचे टँकर्स

साडेसहा तास सीबीआयची झडती

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

हे प्रकल्प थेट हवेतूनच शुद्ध प्राणवायू निर्माण करून त्याचा पुरवठा रुग्णांना करू शकतात. मुंबई महानगरपालिकेने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पांतून प्रतिदिन ४३ मेट्रिक टन प्राणवायू निर्माण होणार आहे, अशी माहिती या ट्वीटमध्ये दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असे देखील या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्रासाठी विशाखापट्टणमहून ऑक्सिजन घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस सध्या नाशिकपर्यंत पोहोचली आहे. लवरकरच ही गाडी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

Exit mobile version