25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषसर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आता पालिकेच्या या नव्या शुल्काचा भार

सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आता पालिकेच्या या नव्या शुल्काचा भार

Google News Follow

Related

पालिकेचे एकूणच उत्पन्न घसरल्यामुळे पालिकेने सर्वच क्षेत्रातील करांमध्ये वाढ करण्याचा सपाटा चालवला. पालिकेचा डोलारा सावरण्यासाठी प्रशासनाने पाणीपट्टी, मालमत्ता कर यानंतर आता आणखी एका शुल्कात वाढ करण्याचे ठरविले आहे.

पालिकेने सुशोभिकरण शुल्क पाच टक्के वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्य म्हणजे आता या प्रस्तावावर स्थायी समिती काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी बसविण्यात आलेली कारंजी, तसेच कृत्रिम धबधबे हे या सुशोभिकरण शुल्कात येणार आहेत. मुख्य म्हणजे या शुल्कात पाच टक्के वाढ झाली तर भविष्यात मुंबईकरांच्या खिशाला कात्री हे स्पष्ट आहे.

पाणीपट्टी, मालमत्ता कर या प्रस्तावांप्रमाणेच आता सुशोभिकरणाच्या प्रस्तावावर स्थायी समिती काय निर्णय देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई शहरातमधील कारंजी तसेच हौद, कृत्रिम धबधबे, दगडांच्या कलाकृती यांचे सुशोभिकरण करताना आता पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून हिरवा कंदील मिळायला हवा. या अशा सुशोभिकरणाच्या कामांवर वर्षाकाठी ६ हजार ५०० शुल्क तसेच २० हजारांची अनामत रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करावी लागते. पालिका प्रशासनाने याच शुल्कामध्ये पाच टक्के वाढीचा निर्णय घेतल्याने आता सर्वांचेच लक्ष स्थायी समितीच्या निर्णयाकडे आहे. या प्रस्तावाला मंजूरी दिल्यास भविष्यात ६ हजार ८२५ रुपये भरावे लागणार आहेत. तसेच अनामत रकमेपोटी २० हजार रुपयांऐवजी २१ हजार भरावे लागतील.

हे ही वाचा:
धाडसी साक्षी आता उभी राहणार

बारावीचा निकाल ९९.६३ टक्के, पुन्हा एकदा मुलीच ठरल्या सरस

मुंबईतील या घरांचे काम पुरते रखडले!

अमित शहा-शरद पवार भेटीचे दरेकरांनी काय कारण सांगितले?

कोरोना संसर्गानंतर मुंबईतील बहुतांशी कारभार हा ठप्प झालेला आहे. तसेच पालिकेने सतत कोरोनाचे कारण पुढे करून इतर अनेक निधी रखडवले आहेत. पालिकेच्या मते महसूल घसरल्याने पालिका ही पावले उचलत आहे. परंतु कोरोनामुळे नागरिकांच्या जगण्यावरही नक्कीच परीणाम झालेला आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा