ड्राईव्ह इन माध्यमातून फरहान अख्तरला कशी मिळाली लस?

ड्राईव्ह इन माध्यमातून फरहान अख्तरला कशी मिळाली लस?

मुंबईतील लसीकरणाला वेग देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ड्राईव्ह इन लसीकरणाचा तोडगा काढला आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद देखील वाढता राहिला आहे. फक्त वृद्धांसाठी असलेली ही सुविधा चांगलीच लोकप्रिय होत आहे. मात्र याच पद्धतीने अभिनेता फरान अख्तर याने देखील लस घेतल्याने वाद उद्भवला आहे. या लसीकरणासाठी असलेल्या वयाच्या निकषात बसत नसतानाही त्याने लस कशी घेतली असा सवाल विचारला जात आहे.

हे ही वाचा :

नमाज पढण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जण जखमी

ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस

संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली… भूषणसिंह कडाडले

आमदार कांबळेंकडून आरोग्य अधिकाऱ्याला मिळाल्या शिव्या, धमक्या

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र चालू केले होते. यात केवळ ज्येष्ठांनाच लस दिली जाते, मात्र अभिनेता फरान अख्तर याने देखील ड्राईव्ह इनच्या माध्यमातून लस घेतल्याने महापालिकेवर टीका केली जात आहे. फरान अख्तर आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून लस घेतल्याचे ट्वीट केले होते.

लसीकरण केंद्रांबरोबरच वृद्धांसाठी सोयीचे पडावे या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रं चालू केली. सुरूवातीला केवळ एकच लसीकरण केंद्र कोहिनूर दादर येथे स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर या लसीकरण केंद्राला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून महापालिकेने इतरही काही केंद्रे चालू केली होती. मात्र या केंद्रांवर केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात असताना ४७ वयाच्या फरान अख्तरला लस कशी देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version