अबब!! २१ वर्षांत २१ हजार कोटी खड्ड्यांत?

अबब!! २१ वर्षांत २१ हजार कोटी खड्ड्यांत?

Image Credit : Twitter @MumbaiMatters

गेल्या २१ वर्षांच्या कालावधीत मुंबई महापालिकेने रस्त्यांवर २१ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त असले तरी शिवसेनेला मात्र बळ मिळते, कारण रस्ते गेले खड्ड्यात आणि टक्केवारी गेली खिशात, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेवर शरसंधान केले आहे.

माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीनुसार, महापालिकेने दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत नवीन रस्ते दुरुस्ती, देखभाल आणि बांधकाम करण्यासाठी २१ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे.

२०१३ ते २०१४ या कालावधीमध्ये तब्बल ३ हजार २०१ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर २०१५ मध्ये रस्ते घोटाळा उघडकीस आला आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. खराब रस्ते ही या शहरातील सर्वात समस्या असलेल्या समस्यांपैकी आहेत, परंतु कित्येक दशकांपासून त्यांची स्थिती बदललेली नाही. याची अनेक कारणे आहेत, ती म्हणजे एकाधिक उपयुक्तता संस्था आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव. रस्ता नवीन बनविला जातो, तेव्हा लगेच केबल टाकण्यासाठी खोदले जातात. आणखी एक अडचण अशी आहे, की कोणतीही मोठी रस्ते बांधकाम कंपनी काम करण्यास पुढे येत नाही कारण त्यांच्यासाठी निविदा कमी किमतीच्या असतात. महापालिकेच्य पोर्टलनुसार मुंबईमध्ये केवळ २०२० मधील खड्यांची संख्या ३१५ च्या तुलनेत आता ४३७ वर गेली आहे.

हे ही वाचा:
भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

…आणि बैल आंदोलनजीवींवर वैतागला!

साऱ्या देशाला हादरवणारा बाराबंकी अपघात झाला तरी कसा?

रस्ता दुरुस्त केला जातो तेव्हा पुरेशी गुणवत्ता तपासणी केली जात नाही. तसेच कामाच्या दर्जाकडे प्राधान्याने दुर्लक्ष केले जाते. पावसाळा सुरू झाल्यावर काही दिवसांतच रस्त्यांवर जागोजागी खड्डे दिसू लागले आहेत. एकूणच काय तर रस्त्यांचे काम नीट न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खड्डे हे पडतातच. महापालिकेकडून अजूनही हे खड्डे बुजवण्याच्या कामाममध्ये होत असलेली दिरंगाई आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी आहे. खड्डे असताना त्यातून वाहने हाकणे आता अतिशय जिकीरीचे झालेले आहे. मुख्य म्हणजे हे खड्डे भरण्यासाठी डांबरचा वापर करण्यात येत आहे. पावसामुळे हे डांबर लगेच वाहून जात असल्याने खड्डे जसेच्या तसेच आहेत.

Exit mobile version