सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून शाळांचे वर्ग सुरू केले. मात्र, आता धक्कादायक बाब समोर आली असून मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊन १० दिवस होत आले तरी २५ शाळेच्या इमारतीचे वापर कोरोना केंद्र आणि लसीकरण केंद्र म्हणून होत असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणारे सुमारे १० हजार विद्यार्थी हे प्रत्यक्ष शालेय शिक्षणापासून वंचित आहेत.

राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये या महापालिकेच्या शाळांचा वापर कोरोना रुग्णांना किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगिकरणात ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्यानंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर महापालिकेच्या या काही शाळांचा वापर लसीकरण केंद्र म्हणून करण्यात येतो होता. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, ज्या ठिकाणी शाळांचा लसीकरण केंद्र किंवा कोरोना सेंटर म्हणून वापर केला जात आहे, अशा शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून त्या शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात याव्यात अशा सूचना आहेत.

हे ही वाचा:

भारत- पाकिस्तान सीमेजवळ मिग विमानाचा अपघात; विंग कमांडरचा मृत्यू

‘फुकट’ची मारहाण आली अंगलट, पोलीस अधिकारी निलंबित

शुक्रवार मध्यरात्रीपासून राज्यभर नवे निर्बंध; जाणून घ्या!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

या नियमावलीनुसार अजूनही मुंबई महापालिका शिक्षण विभाग या शाळा हस्तांतरित करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुमारे २५ शाळांच्या इमारती या अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यातील काही शाळांच्या इमारती या मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असून त्या तातडीने हस्तांतरित करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे.

Exit mobile version