22 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरविशेषमहापालिकेत अर्थसंकट आणि उधळपट्टीही

महापालिकेत अर्थसंकट आणि उधळपट्टीही

Google News Follow

Related

एकीकडे मुंबई महापालिकेवर आर्थिक संकट घोंघावत असताना काहीठिकाणी सुशोभिकरणाच्या नावाखाली कोटी कोटीचा खर्चही होत आहे. त्यामुळे नागरीक संभ्रमात सापडले आहेत.

वरळीतील फुटपाथवर चक्क २६ कोटींची उधळपट्टी पालिकेकडून होत असल्याचे आता समोर आलेले आहे. एकीकडे अर्थसंकट कारण दिलेले आहे, मग ही अशी उधळपट्टी नेमकी कशी परवडते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असल्यामुळे तिथे सध्या सुशोभिकरण सुरू आहे. वरळी सोबतच लोअर परळ, शिवडी, परळ भागातही सुशोभिकरण सुरू झाले आहे.

आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर सेनापती बापट मार्ग, दादर उड्डाणपुलाखालील जागा, वरळी समुद्रकिनारा इथे सुशोभिकरण हाती घेण्यात आले. आता फूटपाथ सुंदर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात सावरकर मार्ग ते सिद्धीविनायक मंदिर परिसरातील फूटपाथची रंगरंगोटी सुरू आहे. वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौक, लोटस येथील ऍनी बेझंट रोडवरील उद्यान यांचीही डागडुजी सुरू आहे.

वरळीमध्ये महापालिका ज्या पद्धतीने वेगाने कामाचा धडाका लावत आहे. त्याच पद्धतीने शहरातील इतर भागांमध्ये वेगाने काम व्हायला हवे, अशी मागणी आता शहरातील नगरसेवक करत आहेत. महापालिकेला सध्या मोठी आर्थिक तूट असल्याचे सतत सांगितले जात आहे. मग दुसरीकडे या कामांसाठी मात्र महापालिकेची मेहेरनजर वरळीकडे मात्र आहे.

हे ही वाचा:

भारतीय गायींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल

ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी

लडाखमध्ये उभा राहतोय हा भव्य प्रकल्प

ठाणे जिल्हयातील पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील घेणार जनतेचा आशीर्वाद

देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका असा मुंबई महानगरपालिकेचा लौकिक आहे. असे असले तरी कोरोनाकाळात महापालिकेला आर्थिक तंगी आता जाणवू लागलेली आहे. कर वसुली घसरली असल्याचे, महापालिका सतत सांगत आहे. तर दुसरीकडे मात्र मलःनिसारण कराचेच केवळ ५१९.३५ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले आहे. सध्याच्या घडीला जवळपास २८ टक्के महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला आहे. यामध्ये मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क, जल आणि मलःनिसारण कर आदी करांचा समावेश आहे. याच करांच्या माध्यमातून ३ हजार ४७१.६२ कोटी रुपये उत्पन्न पालिकेला मिळाले होते. तरीही कर आणि शुल्क वसुलीतून निधी उभा राहिला नसल्याचे अद्यापही पालिकेचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा