मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे लोकं त्रस्त आहे. व्हीआयपींद्वारे या विषयावर वारंवार तक्रारी नोंदवल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेने यावर उपाय म्हणून व्हीआयपींसाठी रस्त्यांचे सपाटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेने आदेश दिल्यानंतर महिनाभरात काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित झाले आहे. असे कळते की राज्याच्या मंत्र्यांना हे रस्ते वापरताना खड्ड्यांचा त्रास झाला. या त्रासाने ग्रस्त होऊन मंत्र्यांनी ह्या तक्रारी नोंदवल्या असतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यांना अजून त्रास ना व्हवहा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे ह्या रस्त्यांच्या दुरुस्ती सकट टर्मिनल-२ प्रवेशद्वार क्रमांक ८ ते पश्चिम महामार्गपर्यंत ४ नवीन रस्ते बनवले जातील. हे रस्ते विमानतळाहून हंसबुर्गा मार्गे पश्चिम महामार्गाला जोडले जातील. ह्या दुरुस्ती कामासाठी तब्बल ९.१ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. याने व्हीआयपींचा प्रवास सोपा आणि सविस्तर होणार आहे.
हे ही वाचा :
श्रद्धाला आफताबपासून व्हायचे होते वेगळे
नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी
अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास
“हे रस्ते दैनंदिन वापरात असल्याने सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करणार आहोत ‘, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “बीएमसी दाखवत असलेली तत्परता हा पुरावा आहे की नागरी संस्था व्हीआयपी लोकांचे जीवन सोयीस्कर बनवण्याच्या बाबतीत जलद काम करू शकते. व्हीआयपींसाठी एकीकडे चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न पालिका करत असताना सर्वसामान्यांना मात्र खड्ड्यांच्या रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. “, असे वकील आणि कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले