सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद

सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद

मुंबईमधील कोवीड लसीकरण सोमवार, १७ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बीएमसी कडून हा निर्णय घेतला आहे. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने तीव्र अशा तौक्ते चक्रीवादळाच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे बीएमसीने हा निर्णय घेतला आहे.

एकीकडे सारा देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच आता त्यात आस्मानी संकटाचीही भर पडली आहे. अरबी समुद्रात आलेले तौक्ते हे चक्रीवादळ हे भारतातील काही राज्यांना थडकले आहे तर आणखीन काही राज्यांना थडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वादळाने कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यात बरेच नुकसान केले असून गुजरात, महाराष्ट्रासारखी राज्य अलर्टवर आहेत.

हे ही वाचा:

तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

आता बँक बुडाली तरी ठेवीदारांना चिंता नाही, मोदी सरकारचा नवा नियम

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

या चक्रीवादळामुले राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सारी कोसळल्या आहेत. तर वादळाच्या अनुषंगाने हानी टाळण्याच्या दृष्टीने राज्यात प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून किनारपट्टी लगत असलेल्या राजधानी मुंबईत शनिवार १५ मे आणि रविवार १६ मे असे दोन दिवस लसीकरण रद्द केले होते तर कोविड सेंटर्समधील अनेक रुग्णांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर सोमवार १७ मे रोजीही मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Exit mobile version