25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर... वाचा सविस्तर

मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर

Google News Follow

Related

राज्यात आणि विशेषतः मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये २० हजार १८१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलेच लक्षणे दिसत नाहीत. अशा कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवतानाच्या मार्गदर्शक सूचना मुंबई पालिकेने जारी केल्या आहेत.

काय आहे नियमावली?

  • ज्या कोरोना रुग्णांना लक्षणे नसतील, त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सीजन पातळी नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास परवानगी असेल.
  • या रुग्णाला स्वतः आणि त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सोय असावी. तसेच कुटुंबातील संपर्कात आलेल्या सदस्यांनीसुद्धा गृह विलीनीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
  • गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःला घरातील एका खोलीमध्ये आयसोलेट करायचे आहे. तसेच इतरांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. दर आठ तासांनी मास्क बदलावा. इतरांच्या वस्तू वापरू नयेत.
  • रुग्णाने स्वतः शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासावी.
  • जे रुग्ण ६० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील असून त्यांना डायबेटिक, हृदयाचा आजार, किडनीचा आजार, हायपर टेन्शन असे आजार असल्यास त्यांना आरोग्य अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर आणि सल्ल्यानुसार गृहविलगीकरणात उपचार घेता येतील.
  • कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल (किंवा अशी व्यक्ती एचआयव्ही, कॅन्सर थेरपीसारख्या आजारातून जात असेल) अशा रुग्णांना गृहविलगीकरणासाठी परावनगी नसेल. डॉक्टरांनी परवानगी दिल्यास आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अशा रुग्णांना गृह विलीगीकरणमध्ये राहता येईल.
  • गर्भवती महिला जिची बाळंतपणाची अपेक्षित तारीख दोन आठवड्यावर आहे अशा रुग्णाला गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी नसेल.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद

मोदी अडथळा बनलेत…

सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित

ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?

राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा तूर्तास विचार नसला तरी निर्बंध आणखी कठोर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, ऑक्सिजन वापर हा दिवसाला ७०० मेट्रिक टनवर पोहचल्यास लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा