पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण रोज वेगवेगळे वळण घेत आहे.आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलशी फेरफार केल्याची नुकतीच माहिती समोर आली होती.या प्रकरणी ससून रुग्नालयातील दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलऐवजी त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल दिल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्नालयाच्या चौकशीसाठी डॉक्टर पल्लवी सापळे यांची समिती स्थापन करण्यात आली होती.समितीच्या अहवालानुसार अशी माहिती समोर आली आहे की, ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीचे म्हणून तीन व्यक्तीचे ब्लड सँपल घेण्यात आले. त्यात एक महिला आणि दोन वयस्कर व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. डॉक्टर श्रीहरी हरणोळ याने हे तीन ब्लड सम्पल घेतले होते. सबंधित महिलेची ब्लड सम्पल हे अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सम्पल असल्याची माहिती अहवालात दिली आहे.
हे ही वाचा:
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या लष्कराला चीनची मदत!
काशी-मथुराच्या मशिदींवरील दावा मुस्लिमांनी सोडावा!
निक्की हेली यांची ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी!
शशी थरूर यांच्या सहायकांना विमानतळावर अटक
याच महिलेचं रक्त पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आलं होत.त्यामुळे अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल त्याच्या वडिलांच्या सॅम्पलशी जुळले नाही. मात्र, दुसऱ्यांदा अल्पवयीन मुलाचे घेण्यात आलेले रक्ताचे सॅम्पल त्याच्या वडिलांच्या रक्ताशी जुळले.यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक झाली होती.त्यामुळे आता या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील अटक होण्याची शक्यता आहे.