थलसेना दिवसाचा अमृतमहोत्सव रक्तदान, शस्त्रप्रदर्शनाला गणेश नाईक, समीर वानखेडेंची उपस्थिती

तरुणांचा कार्यक्रमाला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

थलसेना दिवसाचा अमृतमहोत्सव रक्तदान, शस्त्रप्रदर्शनाला गणेश नाईक, समीर वानखेडेंची उपस्थिती

७५ व्या थलसेना दिवसाचे औचित्य साधून शासकीय/ निमशासकीय माजी सैनिक संघटना, कोंकण विभाग आणि राज्य रक्त संकलन परिषद अंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल तसेच मासाहेब मीनाताई ठाकरे रक्त केंद्र, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने “एक दिवस सैनिकांसाठी” हा उपक्रम रक्तदान शिबिराच्या माध्यमातून कोकण भवन, सीबीडी – बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन रमेश जैद, राज्यकर सह आयुक्त (अपील ) – कोंकण विभाग (से.नि.) तथा सदस्य महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधीकरण, मुंबई यांनी केले तसेच आर्मी स्टेशन मुख्यालय, कुलाबा यांच्यावतीने भरवण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन जितेंद्र भोपळे, सहसंचालक, नगर रचना, कोंकण विभाग यांनी केले.

या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्र, संदीप नाईक, माजी आमदार- ऐरोली विधानसभा यांनी आवर्जून भेट दिली व रक्तदान शिबिराची तसेच शस्त्र प्रदर्शनाची संपूर्ण माहिती घेतली. तसेच माजी सैनिक करत असलेल्या कर्तव्याची तसेच सामाजिक बांधिलकीची प्रशंसा देखील केली.

समीर वानखेडेंची उपस्थिती

या कार्यक्रमास  प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे (IRS) यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. समीर वानखेडे यांनी शस्त्र प्रदर्शनास भेट देऊन सर्व शस्त्रांची माहिती जाणून घेतली तसेच स्वतः उस्फूर्तपणे रक्तदान करून सर्व नवयुवकांना प्रेरित केले. त्यांनी आपल्या प्रोत्साहनपर माध्यमांशी संवाद साधलेल्या संभाषणात माजी सैनिक संघटनेचे तसेच रक्तदान शिबिराचे भरभरून कौतुक केले.

प्रवीण पवार (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक – कोंकण विभाग, पूजा हिप्परगेकर, सहाय्यक नगर रचनाकार कोंकण विभाग, राजेंद्र चौहान, नगररचनाकार- कोंकण विभाग, जयंत पाटील, सहआयुक्त राज्य कर जी.एस.टी प्रशा. रायगड विभाग, नवी मुंबई,  माधुरी डोंगरे, तहसीलदार विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण विभाग, वैदेही मनोज रानडे, अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती ठाणे, अजित पोखरकर, पशुधन वैद्यकीय अधिकारी, संदीप मुळे उपसंचालक माहिती व जनसंपर्क कोंकण विभाग गणेश मुळे, उपसंचालक माहिती व जनसंपर्क कोकण विभाग डॉ.गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी कोकण भवन मा. श्री. कमलेश दिनकर नागरे, राज्यकर उपायुक्त, सिने अभिनेत्री स्वेतलाना दिलीप अहिरे व सिने अभिनेता रमेश वणी यांनी देखील रक्तदान शिबिरास भेट दिली.

शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन

या रक्तदान शिबिरासाठी आर्मी स्टेशन हेडक्वार्टर मुख्यालयातील १५ आसाम रेजिमेंट या युनिट च्या वतीने भव्य असे शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनामध्ये भारतीय सैन्य दलातील विविध प्रकारची शस्त्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. हे पाहण्यासाठी शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी तसेच आसपासच्या शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात कोकण भवन या ठिकाणी आले होते. जवळपास ३,००० व्यक्तींनी या प्रदर्शनास भेट दिली.

रक्तदान शिबिरास एकूण २७० रक्तदात्यांनी रजिस्ट्रेशन केले. त्यातील एकूण २३७ रक्तदात्यांचे रक्त संकलन केले गेले हा एक अभूतपूर्व विक्रमच म्हणावा लागेल. सर्व रक्तदात्यांना व त्यांच्यासोबत आलेल्या मित्रमंडळींना संघटनेतर्फे अल्प उपहार तसेच चहापाणी यांची सोय देखील केली गेली. या कार्यक्रमास संदीप जठारी व जनार्धन जंगम यांनी आकर्षक रांगोळीच्या रूपाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कार्यक्रमास ठाणे महाविद्यालयातील वन महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कॅडेट्स कडून शहीद जवानांस प्रमुख मान्यवरांतर्फे मानवंदना देण्यात आली.

या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात दोन्ही हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे प्रमाणपत्र तसेच शासकीय/ निमशासकीय माजी सैनिक संघटने कडून रक्तदात्यास प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिर कार्यक्रमाची मुख्य संकल्पना रमेश जैद व अजित न्यायनिरगुने यांनी मांडली. याला संघटनेतील दिलीप अहिरे, निलेश कांबळे, गणेश जाधव, दिनकर आरोटे, नितीन सुर्वे, नारायण शिंदे, हरिभाऊ टापरे,  बसेश्वर वसमनी, रवींद्र खोपटकर यांनी त्याच्या संकल्पनेला मूळ रूप प्राप्त करून दिले. सरते शेवटी १५ आसाम रेजिमेंटच्या जवानांनी व एनसीसी कॅडेट्स तसेच संघटनेतील सर्व माजी सैनिकांनी आसाम रेजिमेंटचे गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Exit mobile version