28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषपश्चिम बंगालमध्ये फटाक्यांचा स्फोट; कारखान्याचे छप्पर उडाले, ८ ठार

पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांचा स्फोट; कारखान्याचे छप्पर उडाले, ८ ठार

या स्फोटात आजूबाजूच्या अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये उत्तर २४ परगणाच्या दत्तपुकुर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी सकाळी सकाळी १० वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात आठ जण ठार, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात आजूबाजूच्या अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

पश्चिम बंगाल स्टेट युनिव्हर्सिटीपासून अवघ्या तीन किमी, तर कोलकातापासून ३० किमी अंतरावर नीलगंजमधील मोशपोल येथे ही दुर्घटना घडली. अपघाताच्या वेळी कारखान्यात अनेक लोक काम करत होते. अधिक माहितीनुसार, इमारतीचे छत पूर्णपणे उडून गेले आणि मृतांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह रस्त्यावर आले. या संदर्भात पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

धारावीत अजगर घुसला; घरातल्या पाळीव सशालाच गिळले

पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्याविरुद्ध कोण दाखल करणार आहेत गुन्हा?

आईच्या हातच्या रस्समची चव चाखत प्रज्ञानंदने जग जिंकले

मे महिन्यातही आठवडाभरात तीन स्फोट

याआधी मे महिन्यातही फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये आठवडाभरात तीन स्फोट झाले होते. यापैकी तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी बीरभूम जिल्ह्यात झाली. ज्यामध्ये कोणीही मारले गेले नाही. त्याआधी दक्षिण २४ परगणा येथे झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. पूर्व मेदिनीपूरमध्येही १६ मे रोजी बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात हा प्रकार घडला होता. यामध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा