28 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषस्फोटाने हादरले भागलपूर

स्फोटाने हादरले भागलपूर

Google News Follow

Related

बिहारमधील भागलपूर शहर हे स्फोटाने हादरून गेले आहे. भागलपूर शहरातील काजवली चौक या भागात असलेल्या इमारतीत हा स्फोट झाला. या स्फोटाने आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना कानठळ्या बसल्या. गुरुवार, ३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या या बॉम्बस्फोटाने लोक दचकून गेले. या बॉम्बस्फोटांची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्याची तुकडी घटनास्थळी दाखल झाली.

शुक्रावर दुपार पर्यंत या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत. या स्फोटामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सध्या मलबा उचलण्याचे काम सुरु आहे. या दरम्यानच पोलिसांना खिळे आणि ५ किलो स्फोटके सापडली आहेत. त्यामुळे पोलीस आपल्या तपासात बॉम्बस्फोटाचा अंगालाही तपासात आहेत.

हे ही वाचा:

भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?

‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’

सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

काही दिवसांपूर्वी आयबीने बिहार पोलिसांना बॉम्बस्फोटा संदर्भातील अलर्ट दिला होता. पण भागलपूरच्या पोलीस आयुक्तांनी तीन जण फटाके बनवत असताना स्फोट झाल्याचे म्हटले आहे. स्फोट झाल्याच्या परिसरात अंदाजे ५ किलोमीटरच्या परिसरात जवळपास दहा हजार कुटुंब राहतात. त्यामुळे या सर्व नागरिकांनी आपली रात्र दहशतीत घालवली आहे.

या संपूर्ण घटनेची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली असून या संदर्भात शोक व्यक्त केला आहे. “बिहारमधील भागलपूर येथे स्फोटामुळे झालेल्या जीवितहानीची बातमी अस्वस्थ करणारी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी कामना करतो. घटनेशी संबंधित परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी बोललो. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात सक्रीय आहे आणि पीडितांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे.” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा