25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषदिल्लीत भीषण स्फोट, घटनास्थळी सापडला पांढरा पावडरसारखा पदार्थ!

दिल्लीत भीषण स्फोट, घटनास्थळी सापडला पांढरा पावडरसारखा पदार्थ!

कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

उत्तर दिल्लीच्या प्रशांत विहार येथील पीव्हीआर मल्टिप्लेक्सजवळील एका लोकप्रिय मिठाईच्या दुकानात गुरुवारी (२८ नोव्हेंबर) मोठा स्फोट झाला. पोलिसांना घटनास्थळावर पांढरा पावडरसारखा पदार्थ सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसराला घेराव घालून तपास सुरु केला आहे. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

माहितीनुसार, बन्सी वाला या मिठाईच्या दुकानाला लागून असलेल्या उद्यानाच्या सीमा भिंतीजवळ हा स्फोट झाला. पोलिसांना घटनास्थळावर पांढरा पावडरसारखा पदार्थ सापडला असून तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी स्फोटाच्या कारणाचा तपास करत आहेत. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सकाळी ११:४८ वाजता स्फोट झाल्याचा कॉल आला. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : 

वक्फ बोर्डाकडून ११५ वर्ष जुन्या उदय प्रताप कॉलेजवर दावा

घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद प्रकरण, आरोपी नौशादवर गुन्हा दाखल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा