आंध्र प्रदेशमधील फार्मा कंपनीत स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत

दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील फार्मा कंपनीत स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत

आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले जिल्ह्यात असलेल्या अच्युतापुरम येथील एका फार्मा कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या फार्मा कंपनीतील एका युनिटमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते.

आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एस्सियंटिया या फार्मा कंपनीत बुधवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी भीषण स्फोट होऊन १७ जणांचा मृत्यू झाला. तर, ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्या वेळी हा स्फोट झाला तेव्हा कंपनीमधील अनेक कामगार हे दुपारच्या जेवणासाठी म्हणून बाहेर गेले होते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील कंपनीत झालेल्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा दिल्या आहेत. तसेच नरेंद्र मोदींनी PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केलीये.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?

सावधान… राजकीय गिधाडे सरसावली बलात्काराच्या वणव्यात हात शेकण्यासाठी!

युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास मोठ्या पडद्यावर

‘बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका’

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, एस्सियंटिया या फार्मास्युटिकल कंपनीत आधी भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून मदत कार्य सुरु आहे.

Exit mobile version