छत्तीसगडमध्ये गन पावडरच्या कारखान्यात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

जखमींवर उपचार सुरू

छत्तीसगडमध्ये गन पावडरच्या कारखान्यात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यात एका कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे. एका गन पावडरच्या फॅक्टरीमध्ये हा मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बोरसी गावात असलेल्या स्पेशल ब्लास्ट लिमिटेड गनपावडर कारखान्यात ही घटना घडली. कारखान्यात ८०० हून अधिक लोक काम करतात. सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर कारखान्याभोवती लोकांची गर्दी झाली आहे. सात जणांना रायपूरच्या मेहकरा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तेथे सहा जणांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय अनेकांना रायपूर एम्स आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

हे ही वाचा:

पोर्शे अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन!

‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत

प. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान टीएमसी नेत्याची हत्या

दोनच दिवसांपूर्वी माजाराष्ट्रातील डोंबिवली येथे एका केमिकलच्या कंपनीत स्फोट झाला होता. यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बेमेतराचे जिल्हाधिकारी म्हणाले की, एसडीएमसह प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे. किती जण जखमी झाले आहेत आणि किती लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, याची माहिती सध्यातरी मिळालेली नाही.

Exit mobile version