तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील शिवकाशी येथे गुरुवारी(९ मे) फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे.या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारतातील फटाका हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी शहरात ही घटना घडली.विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील सेंगमलापट्टी येथे सुदर्शन नावाच्या व्यक्तीच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.स्फोटात कारखान्याच्या सात खोल्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
हे ही वाचा:
हिंदू दहशतवादाचे पितृत्व पवारांचेच, ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट!
‘दाऊद टोळी ड्रग्सच्या धंद्यात अजूनही सक्रिय’
निवडणुकीसाठीचा प्रचार हा मूलभूत अधिकार नाही, म्हणत केजारीवालांच्या जामीनाला ईडीकडून विरोध
‘मराठा आरक्षणाचा बनाव रचत बापानेच केली मुलाची हत्या’
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३.४५ च्या सुमारास हा स्फोट झाला.स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याला सुरुवात केली.पोलिसांनी सांगितले की, या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिकांनी सांगितले की, स्फोटाची तीव्रता एवढी होती की सुमारे एक किमी अंतरावरून मोठा आवाज ऐकू आला. स्फोटानंतर कारखान्यातून पांढरा धूर निघताना दिसत होता.दरम्यान, याआधी फेब्रुवारी २०२४ मध्येही तामिळनाडूतील रामुठेवनपट्टी येथे फटाक्यांच्या कारखान्यात १० जणांचा मृत्यू झाला होता.