मुंबईतील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले असून, त्यामुळे हे रस्ते धोकादायक वर्गात मोडले जात आहेत. २०१९ ते २०२१ या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये शहरातील ४८ ब्लॅकस्पॉट्समुळे (ज्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त आहे अशी ठिकाणे) ३४१ अपघात झाले आहेत. त्यात आता पर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वात जास्त अपघात सायन-पनवेल महामार्गावरील ब्लॅकस्पॉर्टसमुळे झाला आहे. त्यामळे हा महामार्ग सर्वात घातक म्हणून ओळखला जातो. तसेच सायन-पनवेल महामार्गावरील ब्लॅकस्पॉर्टस हा वाशी जकात नाकाच्या आधीचा रस्ता म्हणून ओळखला जातो.
ब्लॅकस्पॉट्सच्या यादीत मुंबई शहरातील रस्ते हे प्रथम क्रमांकावर येतात. त्यामध्ये मुंबई मनगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्त्यांवर ४८ ब्लॅकस्पॉर्टस आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नवी-मुंबईतील रस्त्यांवर ३२ ब्लॅकस्पॉट्स आहेत. तर नागपूर हे २३ ब्लॅकस्पॉट्सच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर येणारे शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसानी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ४४ जिल्ह्यांतर्गत रस्त्यांवरील ब्लॅकस्पॉट्सच्या यादीतून ही माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा:
पत्रकार विजय सिंह यांना पितृशोक
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब
तसेच काही अपघात मानवी चुकांमुळे तर खराब दर्जाच्या रस्त्यांमुळे देखील होतात. अपघातांची कारणे शोधताना वाहतूक पोलिस विविध गोष्टींवर विचार करत असतात. २०२१ मध्ये संपूर्ण भारतात दीड लाखांच्या वर रस्ते अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच दोन वेगवेगळ्या भूमिकेतून अपघातांचे कारण समोर आले आहेत. त्यामध्ये ६० टक्के अपघात वाहन अतिवेगाने चालवल्यामुळे तर तर दुसरे कारण म्हणजे वाहन चालवत असताना सीटबेल्टचा वापर न केल्याने देखील अपघातांचे प्रमाण वाढत आहे.