बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा हल्ला; अनेक जवान मारल्याचा दावा!

अनेक जवान मारले गेल्याची आणि जखमी असल्याची माहिती

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा हल्ला; अनेक जवान मारल्याचा दावा!

बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. २४ तासांत दुसऱ्यांदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. तिथे अनेक लोक मारले गेल्याचे वृत्त देखील आहे. बलुचिस्तानमधील केच जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्ब टाकून हल्ला केला. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा पाकिस्तानी सैन्य तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात पाकिस्तानी लष्कराचे जवान मारले गेले आहेत. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पाकिस्तानी सैन्यावर झालेला हा दुसरा स्फोट आहे. एक दिवस आधी, हरनाई येथे पाकिस्तानी लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाचे पायदळ सैनिक रेल्वे ट्रॅक साफ करण्यात व्यस्त असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.

हे ही वाचा : 

अक्कलकोटमध्ये औरंग्याप्रेमींकडून सोशल मिडीयावर स्टेटस, २२ जणांवर गुन्हा दाखल!

औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल!

देशात १९,८२६ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम पूर्ण

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये राबवली स्वच्छता मोहीम

दरम्यान, पाक सरकार आणि बीएलएमध्ये दिवसेंदिवस संघर्ष वाढताना दिसत आहे. मंगळवारी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानच्या बोलन भागात ५०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला आणि प्रवाशांना ओलीस ठेवले होते. यामधील २१४ प्रवाशांना ओलीस ठेवून इतर प्रवाशांना सोडण्यात आले. यानंतर पाक सरकारने दावा केला की कारवाई करत बीएलएच्या तावडीतून सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणले, यावेळी बीएलएच्या ३३ सदस्यांना ठार केले.

मात्र, बीएलएकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या २१४ पाक सैनिकांना ठार केल्याचे बीएलएने म्हटले आहे. पाक सरकारच्या हट्टीपणामुळे पुढचे पाउल उचलल्याचे बीएलएने म्हटले आहे. दरम्यान, याबाबत अजूनही संभ्रम निर्माण आहे. कारण दोनही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.

मेहेंदळे वाचा !आव्हाड, मिटकरी नव्हे | Mahesh Vichare | Jitendra Awhad |  |

Exit mobile version