मृतदेह चुकीच्या घरी पाठवला, बीकेसी कोविड सेंटरचा धक्कादायक प्रकार

मृतदेह चुकीच्या घरी पाठवला, बीकेसी कोविड सेंटरचा धक्कादायक प्रकार

Health workers carry the body of a man, who died from the coronavirus disease (COVID-19), from an ambulance for burial at a graveyard in New Delhi, India, April 16, 2021. REUTERS/Danish Siddiqui - RC2WWM92VDCY

एकीकडे कोरोनाने जवळची माणसं हिरावली तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचं शेवटचं दर्शनही घेणे कुटुंबाचा नशीबी आले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे, तनाळकर आणि घोडके कुटुंबाची.

खरं तर आपल्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा अंतिम विधी तरी आपल्याला करता यावा ही प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. मात्र, ६७ वर्षीय संगीता सदानंद तनाळकर यांचा अंतिम विधी हा त्यांच्या कुटुंबाला करता आला नाही, त्यांचा अंतिम विधी हा भलत्याच कुटुंबाने त्यांचं माणूस म्हणून केला. हे सगळे घडले आहे ते बिकेसी येथील जम्बो कोविड केंद्राच्या गलथान कारभारामुळे.

१५ तारखेला कोरोनाग्रस्त संगीता तनाळकर यांना बिकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारास कुटुंबाने दाखल केले होते. याच वेळेस तिथे ७२ वर्षीय रजनी परब यांना देखील उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने आणले. यावेळी या कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांनी घोळ केला. संगीता आणि रजनी यांच्या रजिस्टर क्रमांकाची आदलाबदली केली. याच दिवसांपासून कनाळकर कुटुंब आणि त्यांची मुलगी वैशाली घोडके या बिकेसी सेंटरमध्ये आपल्या आईची विचारपूस डॉक्टरांकडे करीत होत्या. मात्र, काही तासातच त्यांच्या आई या कोविडं केंद्रात नाहीयेत असे त्यांना कळले. त्यानंतर पुढील चार दिवस त्या कोविड केंद्रात पीपीई किट घालून आपल्या आईचा शोध घेत होत्या.

हे ही वाचा:

२४ एप्रिलपासून तरुणांच्या लसीकरणाची नोंदणी सुरु

मृतदेह दोन दिवस पडून, वाशीम मधील धक्कादायक घटना

राज ठाकरेंनी पुन्हा लिहिले मोदींना पत्र

एसटीच्या फेऱ्या कमी होणार- अनिल परब

तिकडे रजनी परब यांच्या नावाने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ज्यात १८ तारखेला त्यांचा मृत्यूही झाला. डॉक्टरांनी संगीता यांचा मृतदेह परब कुटुंबाला रजनी म्हणून देऊन टाकला. परब कुटुंबाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले. इकडे घोडके आणि तनाळकर कुटुंबाचा शोध या सेंटरमध्ये सुरूच होता. परब कुटुंबाला दुसऱ्या दिवशी त्यांची आई जिवंत असल्याचे कळले आणि त्यांनी सेंटरशी संपर्क केल्यावर अंत्यसंस्कारसाठी दिलेला मृतदेह हा संगीता कनाळकर यांचा होता हे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत तनाळकर आणि घोडके कुटुंब प्रचंड त्रस्त झाले होते.

Exit mobile version