अरुणाचल प्रदेशात भाजपने ३८ जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा भाजपने विजय नोंदवला. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने ३२ पैकी २० जागा मिळवून विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपच्या १० जागा बिनविरोध आल्या होत्या.
अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीने दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच इतर तीन जागांवर आघाडीवर आहे. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने दोन जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीन जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार अपक्षांनी एक जागा जिंकली आहे.
एसकेएमने बहुमताचा आकडा गाठला असून ११ जागांवर आघाडीवर आहे. पवन कुमार चामलिंग यांच्या एसडीएफने आतापर्यंत एक जागा जिंकली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते पेमा खांडू तिसऱ्यांदा आता येणार आहेत. रेनॉक आणि सोरेंग-चकुंग या दोन जागांवर लढणाऱ्या तमांग यांनी पहिल्या जागेवरून ७ हजार ४४ मतांनी विजय मिळवला असून दुसऱ्या जागेवर ते आघाडीवर आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप तिसऱ्यांदा विजयी झाल्याने तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. तशीच परिस्थिती सिक्कीममध्ये आहे.
हेही वाचा..
सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा रद्द
पंजाबमध्ये ‘आप’चा धुव्वा, काँग्रेसला फायदा
“एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू”
आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी २१ ते २३ जागांवर भाजपा
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये १९ एप्रिल रोजी मतदान झाले. सिक्कीममध्ये एकूण ७९.८८ टक्के मतदान झाले, तर अरुणाचल प्रदेशमध्ये ८२.९५ टक्के मतदान झाले होते. सिक्कीममध्ये सत्ताधारी एसकेएम आणि पवन कुमार चामलिंग यांच्या एसडीएफमध्ये मुख्य लढत होती. ईशान्येकडील राज्यातील निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसनेही उमेदवार उभे केले आहेत.
सिक्कीममध्ये मैदानात १४६ जण रिंगणात होते. यामध्ये मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, त्यांची पत्नी कृष्णा कुमारी राय, माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग, माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि भाजपचे नरेंद्र कुमार सुब्बा यांचा समावेश आहे. एसकेएम आणि एसडीएफने प्रत्येकी ३२ उमेदवार उभे केले होते, तर भाजपने ३१ उमेदवार उभे केले होते. काँग्रेसने १२ जागांवर निवडणूक लढवली आणि सिटीझन ऍक्शन पार्टी-सिक्कीमने ३० जागांवर उमेदवार उभे केले.
२०१९ मध्ये प्रेम सिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील एसकेएमने १७ जागा जिंकल्या तर एसडीएफने १५ जागा मिळवल्या. ६० सदस्यीय अरुणाचल विधानसभेसाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. भाजपने सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ १९ जागांवर निवडणूक लढवली. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) यांनीही अरुणाचल प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले होते.
बोमडिला, चौखम, हायुलियांग, इटानगर, मुक्तो, रोईंग, सागले, ताली, तलीहा आणि झिरो-हापोली या मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्यामुळे भाजपने १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. अरुणाचल प्रदेशातील प्रमुख चेहऱ्यांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांचा समावेश आहे, हे दोघेही भाजपचे आहेत. त्यांनी आधीच निवडणूक जिंकली आहे. बियुराम वाहगे (भाजप), निनॉन्ग एरिंग (भाजप), कारिखो क्री (एनपीपी), पानी तारम (भाजप), कुमार वाली (काँग्रेस), कमलुंग मोसांग (भाजप), वांगकी लोवांग (भाजप), आणि जम्पा थर्नली कुनखाप हे इतर प्रमुख उमेदवार आहेत. (काँग्रेस).
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकल्या होत्या. जनता दल (युनायटेड) ने सात, एनपीपीने पाच, काँग्रेसने चार, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) ने एक जागा जिंकली आणि दोन अपक्ष देखील विजयी झाले.