लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आज तिसरी यादी जाहीर केली. या यादीत केवळ नऊ उमेदवारांची नावे आहेत. ही सर्व नावे तामिळनाडू लोकसभा मतदारसंघातील आहेत. पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीनुसार के. अन्नामलाई यांना कोईम्बतूर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. कन्याकुमारी मधून पो. राधाकृष्णन निवडणूक लढवणार आहेत. एल.मुरुगन हे निलगिरीतून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूतून एकही जागा जिंकता आली न्हवती.मात्र, यावेळी नूतन अध्यक्ष अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
कोण आहेत अन्नामलाई?
अन्नामलाई २०११ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. २०१९ मध्ये त्यांनी पोलीस सेवा सोडली. त्यानंतर ते २०२० मध्ये भाजपचा भाग बनले. सध्या ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटच्या अध्यक्षपदी २०२१ मध्ये अन्नामलाई यांची निवड करण्यात आली.सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील थोट्टमपट्टी येथील एका शेतकरी कुटुंबातून येतात.अन्नामलाई गौंडर समाजातील असून ते सध्या ३९ वर्षाचे आहेत.
हे ही वाचा:
लोकसभेच्या महाभारताआधी आदित्य ठाकरे तपश्चर्येवर ?
‘विकसित भारत’चे मेसेज शेअर करू नका!
मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!
केजरीवालांना दणका; अटकेला स्थगिती देणारी याचिका फेटाळली
दरम्यान, पहिल्या यादीत भाजपने एकूण १९५ उमेदवारांची घोषणा केली होती, ज्यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पक्षाने १३ मार्च रोजी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.तर आज पक्षाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली.यामध्ये केवळ ९ उमेदवारांची नावे आहेत.ही सर्व नावे तामिळनाडू लोकसभा मतदारसंघातील आहेत.भाजपने आतापर्यंत तिन्ही यादीत २७६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.