येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सज्जता करत आहे. त्यादृष्टीने ‘मिशन ४५ ‘च्या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबरपासून ‘धन्यवाद मोदीजी’मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत भाजपाच्या वतीने केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. राज्य भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण दहा लाख पत्र पाठवण्याचं नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेसाठी आपल्या ‘मिशन ४५’ ठरावानंतर, भारतीय जनता पक्षाने २०० विधानसभा जागा जिंकण्यासाठी २०२४ मध्ये न जिंकलेल्या ९८ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेआहे. त्यापैकी काही जागा सध्या अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासह विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांकडे आहेत. केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नियुक्त करून महाराष्ट्रातील ४८ पैकी १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘मिशन ४५’ चाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अलीकडेच पुणे दौरा केला होता. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा त्यांनी केला होता .
हे ही वाचा:
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ‘ऑपरेशन मेघदूत’
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
नवरात्र २०२२: महाराष्ट्राचं शक्तीस्थळ तुळजापूर
नवरात्रीसाठी बाजार फुलले, धारावीच्या कुंभारवाड्यात लगबग सुरू
मतदारसंघांची यादी तयार करण्यासाठी गेल्या निवडणुकीतील पक्षाची कामगिरी, राजकीय मुद्दे आणि राजकीय खेळाडू, जातीची रचना आणि संघटनात्मक स्थिती यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. पक्षाचे आमदार आणि सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची मिशनचे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.