तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकला उतरती कळा; भाजप राज्यातील तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता!

यंदाच्या लोकसभेत स्वबळावर ११.३ टक्के मते मिळविली

तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकला उतरती कळा; भाजप राज्यातील तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता!

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप तमिळनाडूमध्ये एकही जागा जिंकू शकला नाही, परंतु त्यांनी स्वतःच्या बळावर ११.३ टक्के मते मिळविली आहेत. याचा अर्थ राज्याच्या राजकारणात तिसरी शक्ती म्हणून त्यांना स्थान मिळाले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक)च्या नेतृत्वाखालील आघाडीने यावेळी राज्यातील सर्व ३९ लोकसभा मतदारसंघांवर विजय मिळवला आहे. मात्र त्यांच्या मतांच्या टक्केवारीत सन २०१९च्या तुलनेत ५.६ टक्के घट झाली आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके)च्या नेतृत्वाखालील आघाडीचा मतटक्का सन २०१९च्या तुलनेत २०२४मध्ये ७.७ टक्क्यांनी घसरला आहे. सन २०१९मध्ये अण्णाद्रमुकसोबत भाजपने निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांच्या मतांची तुलना सरळ पद्धतीने करता येत नाही.

भाजपची उल्लेखनीय कामगिरी
भाजपला ११.३ टक्के मते मिळाली आहेत. तमिळनाडूमधील कोणत्याही लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. भाजपने लढवलेल्या अधिक जागा, हे मतटक्कावाढीमागचे कारण ठरू शकते. भाजपने या निवडणुकांमध्ये २३ पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. तामिळनाडूमध्ये भाजपने १९९१च्या लोकसभा निवडणुकीत १५ जागा लढवल्या होत्या; आणि सन २००९मध्ये १८ जागा लढवल्या होत्या.

सन २०२४मध्ये भाजपने मिळवलेली १९.६ टक्के मते ही मागील बहुतेक निवडणुकांपेक्षा जास्त आहेत. भाजपने जेव्हा पाच ते नऊ जागा लढवल्या, तेव्हा भाजपचा मतटक्का जास्त होता. मात्र तेव्हा मोठ्या पक्षाशी केली युती किंवा राज्यातील संबंधित बालेकिल्ल्यांपुरतेच मर्यादित राहणे, हे यामागील कारण असू शकते. या निवडणुकांमध्ये राज्यातील बहुसंख्य जागा लढवताना भाजपच्या मताधिक्यात झालेली वाढ हे सूचित करते की येथे भाजपचे चिन्ह लोकप्रियता मिळवत आहे. सन २०१४ वगळता, भाजपने पाचही निवडणुकांमध्ये द्रमुक किंवा अण्णाद्रमुकसोबत युती केली होती. मात्र तेव्हा २०२४पेक्षा मतटक्का अधिक होता. सन २०१४मध्येही भाजपने केवळ नऊ मतदारसंघांवर निवडणूक लढवली होती.

हे ही वाचा:

‘हमारे बारह’ चित्रपटाला स्थगिती मिळाल्यानंतर इस्लामवाद्यांकडून कलाकारांना धमक्या

‘राहुल गांधी निवडणुकीतील पराभव सहन करू शकले नाहीत’

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!

भाजपला कसा झाला लाभ?
या प्रश्नाचे उत्तर सरळ देणे शक्य नाही. युतीत असताना एखाद्या पक्षाचा मतांचा वाटा तो निवडणूक लढवलेल्या मतदारसंघामध्येही पूर्णपणे स्वतःचा असू शकत नाही. तथापि, २०२४च्या निवडणुकीत भाजप मुख्य पक्ष होता, असे गृहीत धरून काही मतदारसंघनिहाय विश्लेषणावर नजर टाकल्यास वेगळे चित्र दिसेल. भाजपने लढवलेल्या २३ मतदारसंघांपैकी सन २०१९च्या तुलनेत २१ मतदारसंघांत द्रमुक आघाडीचे, एआयएडीएमकेने १९ मतदारसंघांत तर, बिगर द्रमुक/एआयएडीएमके/भाजपने आघाडी न केलेल्या पक्षांचे मताधिक्य १८ मतदारसंघांत कमी केले आहे. या आकडेवारीनुसार, द्रमुक, अण्णाद्रमुक, त्यांच्याशी किंवा भाजपशी संबंधित नसलेले पक्षांनी भाजपने लढवलेल्या बहुतेक मतदारसंघांमधील मते गमावली आहेत.

प्रत्येक मतदारसंघात सर्वांत मोठे नुकसान कोणाचे
११ मतदारसंघांत अण्णाद्रमुकचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. सहा मतदारसंघांत द्रमुकची युती आणि उर्वरित सहामध्ये असंलग्न पक्ष आहेत. निश्चितपणे, सन २०१९मध्ये अण्णाद्रमुक युतीचा भाग म्हणून भाजपने २३ पैकी तीन मतदारसंघ (कन्याकुमारी, कोईम्बतूर आणि शिवगंगा) लढवले. मात्र अण्णाद्रमुक युतीने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत वरील तीनपैकी कोणत्याही मतदारसंघात भाजपने २०१९मध्ये मिळवलेल्या मतांची बरोबरी गाठलेली नाही. कन्याकुमारी आणि कोईम्बतूरमध्ये ते भाजपच्या मागे आहेत.

यावरून असे दिसून येते की, किमान दोन मतदारसंघांत भाजपला मोठा फटका बसला आहे. अण्णाद्रमुकने द्रमुकपेक्षा इतर मतदारसंघांत अधिक मताधिक्य गमावल्याने भाजपला राज्यातील इतर पक्षांपेक्षा अण्णाद्रमुकच्या घटलेल्या मतांचा अधिक फायदा झाल्याचे दिसत आहे.सन २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होतील, तेव्हा भाजप हा वेग टिकवून ठेवू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकी आहे. शेवटी, अण्णाद्रमुक हा अजूनही राज्यात भाजपपेक्षा मोठा विरोधी पक्ष आहे.

Exit mobile version