भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे.दुसऱ्या यादीमध्ये ७२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.या यादीमध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे समोर आली आहेत.यादीत महाराष्ट्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे.नागपूरमधून नितीन गडकरी, बीडहून पंकजा मुंडे पुण्याहून मुरलीधर मोहोळ आणि चंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहेत.
भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.यानंतर पक्षाकडून आज ७२ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण २० उमेदवारांचा समावेश आहे.आजच्या यादीनुसार भाजपने अनेकांना संधी दिली आहे.परंतु, अनेक दिग्गज नेत्यांची नावं देखील कापली आहेत.
हे ही वाचा:
मनोहर लाल खट्टर पंजाबचे राज्यपाल होण्याची शक्यता!
मविआला ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी
१४ महिन्यांच्या वनवासानंतर रिषभ पंत उतरणार मैदानात
मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा!
यामध्ये भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे नाव कापून त्यांच्याजागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
तसेच बीडमधून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे.दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक यांना धक्का दिला आहे.जळगावमध्ये खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातले २० भाजप उमेदवार
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
बीड- पंकजा मुंडे
नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील