26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषविधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार

महिला, आरोग्य, शिक्षण, युवा वर्गासाठीची आश्वासने या संकल्प पत्रात असण्याची शक्यता

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरू असून सध्या प्रचाराला वेग आला आहे. राज्यात यंदा एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. दरम्यान, आता भाजपाचे संकल्प पत्र जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार, १० नोव्हेंबर रोजी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्र (जाहिरनामा) लाँच करणार आहेत. काँग्रेसने यापूर्वीचं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या संकल्प पत्रात कोणते मुद्दे असणार आणि कोणत्या घटकाला काय लाभ मिळणार याकडे लक्ष असणार आहे. महिला, आरोग्य, शिक्षण, युवा वर्गासाठीची आश्वासने या संकल्प पत्रात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू

मुंबईत बांगलादेशी, रोहिंग्या वाढतील, २०५१ पर्यंत हिंदू राहतील ५४ टक्के

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना महिना ३ हजार रुपये, महिलांना एसटीचा प्रवासही मोफत असणार, बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये मिळणार, शेतकऱ्यांची ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार, २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, आणि औषधे मोफत मिळणार, जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देणार, अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “काँग्रेसने कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी अशी आश्वासने दिली आहेत, पण नंतर ते म्हणतात की छपाईची चूक झाली. नंतर ते म्हणतात की त्यांच्याकडे पैसे नाहीत. ते केंद्राकडे पैसे मागतात.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा