महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आणि माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. किसनराव जोर्वेकर यांच्या विरोधात भाजकडून जळगावमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. मविआकडून काल करण्यात आलेल्या धरणे आंदोलनातील किसनराव जोर्वेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यात गोळ्या पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी देत असल्याचे दिसून आले. यानंतर आज(२४ जून) भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक होऊन जळगावमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे, त्यांनी या मतदारसंघात निवडून येवून दाखवावं. शपथ घेऊन सांगतो मी तुला संपवून टाकेन, माझं वय ७३ आहे. मला कॅन्सर, मधुमेह आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडेन, अशी धमकी किसनराव जोर्वेकर यांनी मंगेश चव्हाण यांना दिली होती. या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली.
हे ही वाचा:
पुणे ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी निलंबित !
भय्यू नावाने फसवून अर्शदने केला लव्ह जिहाद
नीट परीक्षा घोटाळा लातूर कनेक्शन, चौघांना अटक!
पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!
यानंतर किसनराव जोर्वेकर यांच्या विरोधात मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांकडून जळगावमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी किसनराव जोर्वेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. याशिवाय एका समर्थकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील करण्यात आल्याची माहिती आहे.