उत्तर मुंबईतून भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे.उत्तर मुंबईचे लोकसभेचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे विजयी झाले आहेत.पियुष गोयल यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायूतीकडून भाजपचे पीयूष गोयल हे उमेदवार होते.तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर भाजपचा उमेदवार विजयी होणार अशी सुरवातीपासूनचा चर्चा होती.अखेर भाजप उमेदवार पियुष गोयल यांचा विजय झाला आहे.या जागेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली होती.मात्र, महाविकास आघाडीला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला.
हे ही वाचा:
इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत
अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा धडा!
पीयूष गोयल यांना ३ लाख ४५ हजार ७०९ मतं मिळाली तर भूषण पाटील हे १ लाख ६७ हजार ५०३ मतांनी पिछाडीवर होते. याचाच अर्थ पीयूष गोयल हे १ लाख ७८ हजार २०६ मतांनी विजयी झाले आहेत.