तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

भाजपाच्या ‘सदस्यत्व मोहीम- २०२४’ला तुफान प्रतिसाद

तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

Prime Minister Narendra Modi with Union Minister and BJP National President J.P. Nadda during the launch of BJP's membership campaign 'Sadasyata Abhiyan 2024', in New Delhi | PTI

भारतीय जनता पक्षाने (भाजपा) संपूर्ण भारतात राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ‘संघटन पर्व सदस्यत्व अभियान- २०२४’ नावाने २०२४ च्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेचे उद्घाटन केले. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराचे पहिले सदस्य बनवले आणि मोहिमेची सुरुवात केली. यानंतर या मोहिमेला देशभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या मोहिमेच्या माध्यमातून एक कोटी सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

भाजपाने गुरुवारी ‘सदस्यत्व मोहीम- २०२४’ अंतर्गत तीन दिवसांत एक कोटी सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाकडून या मोहिमेच्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे. भाजपाने एक व्हिडिओ पोस्ट करून कॅप्शन दिले आहे की, “एक कोटी आणि मोजणी सुरू आहे… ही तर फक्त सुरुवात आहे. एकत्रितपणे आम्ही एक अविश्वसनीय मैलाचा दगड गाठला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी गुरुवारी पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्लीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना भाजपाचे नूतनीकरण केलेले सदस्यत्व प्रमाणपत्र सुपूर्द केले. तर, भाजपाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांच्यासह नड्डा यांनी गुरुवारी पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेचा भाग म्हणून दिल्लीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भाजपाचे सदस्यत्व प्रमाणपत्र सुपूर्द केले. सदस्यत्व मोहिमेची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर. प्रत्येक टप्प्याचे विशिष्ट लक्ष्य असून यामुळे देशभरात सर्वसमावेशक ही मोहीम पार पडेल.

हे ही वाचा :

कपिल परमारने ज्युदोमध्ये कांस्यपदक जिंकून रचला इतिहास,अशा कामगिरीने ठरला पहिला भारतीय !

लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

‘लाडकी बहीण’ योजनेवरून खोटा आरोप करणाऱ्या आव्हाडांविरोधात गुन्हा

५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

‘संघटन पर्व, सदस्यता अभियान २०२४’ येथे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्या सदस्यत्वाच्या नूतनीकरणाचे प्रमाणपत्र देऊन नवीन सदस्यत्व मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतीय जनता पक्षाची सदस्यत्व मोहीम ही कुटुंबाचा विस्तार आणि एक वैचारिक चळवळ आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय जनसंघाच्या काळापासून आतापर्यंत आम्ही देशात नवीन राजकीय संस्कृती आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

Exit mobile version