बेकायदेशीर असेल तर मशिदी, मदरसेही पाडले पाहिजेत!

संजौली वादावर भाजपचे गिरीराज सिंह यांचे वक्तव्य

बेकायदेशीर असेल तर मशिदी, मदरसेही पाडले पाहिजेत!

हिमाचल प्रदेशातील शिमल्याच्या संजौली मधील बेकायदेशीर मशीद वादावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ती एक बेकायदेशीर मशीद असून पाडण्यात आली पाहिजे. देशातील सर्व बेकायदेशीर मशिदी आणि मदरसेही पाडले पाहिजेत, असे मंत्री गिरीराज सिंह म्हणाले आहेत. सध्या देशात एक अतिशय खोल षडयंत्र सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, देशात एक षडयंत्र सुरु आहे. देवभूमी पासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा देशाचा अन्य कोणताही भाग असो, ज्या ठिकाणी हिंदू लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी मुस्लिमांना बसवा आणि येणाऱ्या दिवसात इस्लामिक राज्य घोषित करण्याचे काम करा, असे सर्व चालू आहे. ते पुढे म्हणाले, बेकायदेशीर मशिदी-मदरसे पाडले पाहिजेत. हे अवैध मशिदी भारतामध्ये आतंकवादी जन्मास घालत आहेत.

हे ही वाचा : 

पप्पू, पन्नू आणि पनौती…

गणेशमूर्तींच्या विटंबनेसाठी केला मुलांचा वापर !

उधमपूरच्या कठुआ सीमेवर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान !

काँग्रेसचे खोटे नरेटिव्ह राहुल गांधींमुळे पुरते स्पष्ट !

हिमाचल सरकारचे मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, बेकायदेशीर इमारत आढळली तरी ती पाडण्यात येईल. आम्हाला हिमाचलमध्ये शांतता हवी आहे कारण हिमाचल हे शांत राज्य आहे. दरम्यान, बेकादेशीर मशिदी विरोधात आज हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंदू समुदाय एकवटला होता.

Exit mobile version