राज्य सरकारकडून राबण्यात येणाऱ्या सरकारी योजनेवरती मविआच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते. मात्र, योजना लागू झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यात मविआचे नेते तेवढेच पुढे असतात. राज्य सरकारने नुकतेच चालू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावर मविआचे नेत्यांनी पुन्हा हात मारण्याचे काम केले आहे. एकीकडे सरकारच्या योजनांचा विरोध करायचा आणि नंतर स्वतःचे नावं लावून त्याच योजनांची जाहिरातबाजी करायची. विरोधकांच्या या दुटप्पीपणावर भाजपने जोरदार टीका केली आहे. सरकारच्या योजनांवर स्वतःचा फोटो लावून जाहिरात बाजी करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करत हा दुटप्पीपणा आजोबांकडून शिकलात का?, असा सवालही भाजपने रोहित पवार यांना विचारला आहे.
भाजपा महाराष्ट्र ट्विटर हॅन्डलरकडून ट्विट करत म्हटले की, विधानभवनात महायुती सरकारच्या योजनांचा विरोध करायचा आणि नंतर स्वतःचे नावं लावून त्याच योजनांची जाहिरातबाजी करायची हा दुटप्पीपणा आजोबांकडून शिकलात का? आत्या आणि भाचा यांच्या शब्दकोशात ‘स्वकर्तृत्व’ हा शब्दच नाही…खरंतर माविआ सरकारने लोकसभा निवडणुकीत महिलांच्या खात्यात खटाखट साडे आठ हजार रुपये येणार असं खोटं सांगत गोर गरीबांकडून मत लाटली… नंतर मात्र पाठ फिरवली. एकंदरीतच काय …यांना विकासाची कामं कधी जमत नाही… आणि श्रेयचोरीच्या मामल्यात मविआचा हात कोणी पकडू शकत नाही, असे भाजपने म्हटले आहे. तसेच सरकारी योजनांवर स्वतःचा फोटो लावून जाहिरातबाजी करणाऱ्या रोहित पवार आणि रवींद्र धंगेकर यांचा फोटो देखील भाजपने ट्विट केला आहे.
हे ही वाचा:
माजी मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर गुन्हा
कर्नाटक सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही
भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये पैसे का ठेवले…
आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’
श्रेयचोरांचे ‘स्मॉलर व्हर्जन’ म्हणजे रोहित पवार…
विधानभवनात महायुती सरकारच्या योजनांचा विरोध करायचा आणि नंतर स्वतःचे नावं लावून त्याच योजनांची जाहिरातबाजी करायची हा दुटप्पीपणा आजोबांकडून शिकलात का?
आत्या आणि भाचा यांच्या शब्दकोशात ‘स्वकर्तृत्व’ हा शब्दच नाही…
खरंतर माविआ… pic.twitter.com/8AUZipFbYC— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 12, 2024