29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषतृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याचा खून

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याचा खून

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील चांदपूर गावात तृणमूल काँग्रेसच्या १० ते ११ गुंडांच्या जमावाने एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ही घटना शनिवारी १ जून रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हफिजुल शेख असे मृताचे नाव आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. आरोपींनी आधी शेख यांच्यावर गोळी झाडली आणि नंतर त्याचे शीर शरीराच्या इतर भागापासून वेगळे केले.
समोर आलेल्या व्हिज्युअल्समध्ये हाफिझुल शेखचा शिरच्छेद केलेला मृतदेह रस्त्याच्या कडेला एका बाजूला पडलेला दिसत आहे. या घटनेबाबत प्रसार माध्यमाशी बोलताना मृताचा भाऊ म्हणाला, “शेख त्यावेळी कॅरम खेळत होता. तृणमूल काँग्रेसशी संबंधित चांदपूर गावातील एक नेता त्याच्या साथीदारांनी येथे येऊन माझ्या भावावर दोन वेळा गोळ्या झाडल्या.

हेही वाचा..

ती गाडी आपला मुलगाच चालवत होता….अल्पवयीन आरोपीच्या आईने दिली कबुली

अरुणाचल प्रदेशात भाजपचा तिसऱ्यांदा दणदणीत विजय

सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा रद्द

निवडणूक झाली, एक्झिट पोल्सही जाहीर आता नरेंद्र मोदी लागले कामाला

त्यानंतर त्यांनी त्याचे डोके तोडले आणि ते काढून घेतले. हा प्रकार दिवसाढवळ्या घडला. या घटनेत सामील असलेले गुन्हेगार आणि समाजकंटक आहेत. ते इथेच थांबले नाहीत. त्यानंतर टीएमसीचे गुंड इतर भाजप कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्यावर बॉम्बने हल्ला केला.

शेखच्या भावाने सांगितले की, टीएमसीचे गुंड कासिम, सोहोज, नसीम, ​​सोबुज, अली, बंडू आणि इतरांचा आपल्या भावाच्या निर्घृण हत्येत सहभाग होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा