27 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेषतीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता

तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता

मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी आणि रविवारी आमदारांची बैठक होण्याची शक्यता

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये मोठा विजय मिळवून देणाऱ्या महिलांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद महिलांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. राज्यातील जातीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप मध्य प्रदेशमध्ये दोन आणि राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकतात, असे मानले जात आहे.

तिन्ही राज्यांमधील निवडणुकांत यंदा महिलांच्या मतटक्क्यांत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाच्या राजकीय सक्षमीकरणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले जाईल, असे सांगितले जात आहे. या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी आणि रविवारी आमदारांची बैठक होऊ शकते. यासाठी बुधवारी तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाऊ शकते.

हे ही वाचा:

दादरमधील ‘भरतक्षेत्र’ दुकानावर छापेमारी; १५ लाख रुपये रोख जप्त

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; नऊ विधेयकं मांडणार

दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?

पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!

मध्य प्रदेशमध्ये ओबीसी, छत्तीसगढमध्ये एसटी आणि राजस्थानमध्ये राजघराणे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा ओबीसीला, छत्तीसगढमध्ये एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीला तर, राजस्थानमध्ये राजघराण्यातील व्यक्तीला मिळणे हे जवळवळ नक्की झाले आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशमध्ये प्रल्हाद सिंह मुख्यमंत्री होऊ शकतात. नरेंद्र सिंह तोमर यांना मध्य प्रदेश तर, किरोडीलाल मिणा यांना राजस्थानचे सभापती बनवले जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा