25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषभाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!

भाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

राज्यात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती २०० हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे वाटतंय, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जो ‘धर्मयुद्धा’चा नारा पुकारला होता आणि ‘आम्ही सगळे एक आहोत’ हा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि राज्यात सुद्धा भाजपचे सरकार येईल. आकडेवारीपाहता महाराष्ट्राच्या जनतेचे आभार कोणत्या शब्दात मानायचे हे सुचत नाहीते. विजयाची आम्हाला खात्री होती, मात्र लीड पाहून आम्ही स्तब्ध झालो आहोत. याबद्दल आमच्या लाडक्या बहिणीचे आभार कारण यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे, हे जनतेने दिलेल्या कौलावरून स्पष्ट झाले आहे. महायुतीचाच विजय होईल, ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असतो. भाजपा १२५ हून अधिक जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपचा मुख्यमंत्री असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतील, असे दरेकर म्हणाले.

हे ही वाचा :

२० हजार अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान मणिपूरमध्ये तैनात

नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

सायबर ठगांसाठी बँक खाती पुरविणाऱ्या आमीर मणियारला अटक

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्ही सहर्ष स्वीकार करू!

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा