भाजप सर्व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने निवडणूक लढणार

आमदार आशिष शेलार यांची माहिती

भाजप सर्व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने निवडणूक लढणार

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष सर्व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. महाराष्ट्र सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला, त्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आल्याचे ते म्हणाले. आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार शेलार बोलत होते.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. आमदार शेलार म्हणाले, राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात १० जुलै पर्यंत आम्ही सहकारी पक्षांना बरोबर घेऊन भरीव कार्यक्रम करणार आहोत.

हेही वाचा..

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजाना’ सुरु करणार

‘दिल्लीच्या विमानभाड्यात असामान्य वाढ करू नका’

धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेचा अहवाल पक्षपाती’; भारताकडून सडकून टीका

बिहारमध्ये ११ दिवसांत पाच पूल कोसळले

सहकारी पक्षांच्या नेत्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे बैठका घेतील. त्यांना बरोबर घेऊनच आम्ही येणाऱ्या निवडणुका आत्मविश्वासाने, मजबुतीने लढू आणि जिंकू, असा विश्वास यावेळी आमदार शेलार यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केल्याच्या प्रश्नावर आमदार शेलार म्हणाले, आमचा अर्थसंकल्प हा थेट मदत करणारा आहे. इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली, खात्यात साडेआठ हजार देणार असल्याचे सांगितले होते, त्याची आता लोक वाट बघत आहेत, असेही आमदार शेलार म्हाणाले.

Exit mobile version